श्रीरामपूर : हल्लीच्या आधुनिक काळातील धकाधकीच्या जीवनात शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी दररोज योगासने करणे आवश्यक आहे. योगासने केल्याने जीवनात आनंद व उत्साह निर्माण होतो, असे प्रतिपादन भि. रा. खटोड कन्या विद्यालयाचे चेअरमन श्री. दत्तात्रय साबळे यांनी आपल्या मनोगतात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केले.
याप्रसंगी योग मार्गदर्शिका सौ. कीर्ती हिरण,सौ. गिरीजा शिंदे,सौ. मनीषा फरगडे यांनी योगासनांचे जीवनातील महत्त्व सांगून प्रात्यक्षिके सादर केली व विद्यार्थिनिंना योगासने शिकवली.
या कार्यक्रम प्रसंगी ज्युनियर कॉलेजच्या चेअरमन सौ. ज्योत्स्नाताई तांबे,श्री. अरुण धर्माधिकारी,श्री. किशनशेठ अहुजा,श्री. अमोल कोलते, श्रीम. सुजाता मालपाठक, प्राचार्या सौ. विद्या कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अजय पुंड यांनी केले.स्वागत व प्रास्ताविक श्री.आदिनाथ जोशी यांनी केले.मान्यवरांचा परिचय व सत्कार सौ.अनिता शिंदे यांनी केला तर आभार प्रदर्शन श्री.संदीप निकम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व सेवक वॄंद यांनी परिश्रम घेतले.