भाजपा उत्तर नगर जिल्हा सचिव पदी दत्तात्रय खेमनर यांची निवड


श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) : श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबाद येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा प्रखड हिंदुत्ववादी म्हणून ओळख असणारे  भाजपा भटके विमुक्त आघाडीमध्ये गेले दहा वर्षापासून काम करत असलेले दत्तात्रय खेमनर यांना भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये बढती देण्यात आलेली आहे. 

गेली दहा वर्षापासून  दत्तात्रय खेमनर हे पक्षाचे ध्येय धोरण व भटक्या विमुक्तांसाठी  मोठं काम केल्यामुळे त्यांना भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मा खा डॉक्टर विकास महात्मे, भाजपा कार्यालय मंत्री रवी जी आनसपुरे, भाजपा प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर, यांच्या शिफारशीवरून  जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे  यांनी दत्तात्रय खेमनर यांना भाजपाच्या  फादर बॉडी मध्ये जिल्हा सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली.

 दत्तात्रय खेमनर हे  गेली पंधरा वर्षे धनगर समाजाचा देखील नेतृत्व करतात त्यांचं जिल्ह्यांमध्ये मोठ्या संघटन आहे.  याचा फायदा पक्षाला नक्कीच होऊ शकतो  त्याचबरोबर भाजपामध्ये धनगर समाजाला मोठी संधी देण्याचे काम भाजपाचे प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर यांनी केलं. दत्तात्रय खेमनर यांच्या निवडीने उत्तर नगर जिल्ह्यातील भाजपाला  एक मोठ युवा नेतृत्व मिळाला आहे.

दत्तात्रय खेमनर हे  अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या निवडीबद्दल महायोगी शिवशक्ती कालिदास बाबा  महंत स्वामी अरुणाथ गिरी महाराज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   विश्व हिंदू परिषद चे भाऊराव कुदळे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  खासदार डॉक्टर विकास महात्मे  अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे अध्यक्ष  बापूसाहेब शिंदे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे आदींनी अभिनंदन केले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post