कोपरगावच्या शारदा शाळेत १८०० विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी केली एकत्रित योगसाधना


कोपरगांव (गौरव डेंगळे) : दरवर्षी २१ जून रोजी संपूर्ण जग एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतात.ही जागतिक घटना योगाच्या प्राचीन भारतीय पद्धतीला आणि त्याचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कल्याणावर खोल परिणाम करतात. योग हा शब्द संस्कृत शब्द "युज" वरून आला आहे, ज्याचा अर्थ "सामील होणे" किंवा "एकत्रित होणे" आहे आणि मन, शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवाद आणण्याच्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे. त्याचेच औचित्य साधत सोमय्या विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव येथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योग शिक्षिका सौ सुजाता शेडगे,रुपाली जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली १८०० विध्यार्थी व शाळेच्या शिक्षकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी एकत्रित योग साधना केली.

योग ही आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे.हीच प्राचीन परंपरा नविन पिढीला निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरेल. म्हणून जगभरात २१ जुन  आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. स्वत:साठी आणि समाजासाठी योग या थीमसह आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा करण्यात आला आहे.

यावेळी शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे,उप प्राचार्या सौ शुभांगी अमृतकर, हायस्कूल पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे,प्राथमिक पर्यवेक्षिका सौ पल्लवी ससाणे,प्री प्रायमरी पर्यवेक्षिका सौ नाथलीन फर्नांडिस व शाळेतील शिक्षक वृंदानी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा आनंद घेतला.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post