सुरुवातीला मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी सर्वांचे स्वागत करून शालेय उपक्रमांबद्दल माहिती दिली. यावेळी इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प, फुगे व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.नायगावचे सरपंच डॉ.राजाराम राशिनकर यांनी आपल्या मनोगतातून नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन जुने नायगाव मधील सर्व पालकांनी शाळेची गुणवत्ता व उपक्रम पाहून यावर्षीही सर्व दाखलपात्र मुले इयत्ता पहिलीत जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल केल्याबद्दल पालकांचे अभिनंदन शिक्षकांचे कौतुक केले.तसेच त्यांनी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगून यावर्षी सर्वांनी भरपूर वृक्षाची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले.जे विद्यार्थी वर्षभर कमीत कमी पाच वृक्षांची लागवड करून संगोपन करतील त्यांना वृक्षमित्र पुरस्कार देण्याचे शाळेच्या वतीने जाहीर करण्यात आले.
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.सर्व मुलांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.कार्यक्रमास सरपंच डॉ.राजाराम राशिनकर,ज्येष्ठ नागरिक बाजीराव भुसारी, बापूसाहेब लांडे,श्रीकृष्ण लांडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश लांडे,माजी अध्यक्ष संतोष राशिनकर,संदिप धसाळ,रविंद्र दरेकर,अविनाश लांडे,विश्वंभर दातीर,सागर लहारे, दिपक राशिनकर,प्रमोद भवार,सौ.तुळसाबाई नजन,सौ.मधुमती लांडे,सौ.सुमन पवार आदी उपस्थित होते.शेवटी शिक्षिका सुजाता सोळसे यांनी सर्वांचे आभार मानले.