श्रीरामपूर : तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या स्व.सौ.एस.के.सोमैया प्राथमिक विद्यामंदिरची विद्यार्थिनी कु.माहेश्वरी संतोष वाघमोडे (इ.४थी) हिने विविध स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवले.तिने राज्यस्तरीय भारत टॅलेंट सर्च परीक्षेत १५० पैकी १४० गुण मिळवून राज्यात ५ वा क्रमांक पटकाविला.तसेच राज्यस्तरीय नॅशनल स्कॉलरशिप परीक्षेत २०० पैकी १६६ गुण मिळवून राज्यात १३ वा क्रमांक पटकाविला.
राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत ३०० पैकी २६४ गुण मिळवून श्रीरामपूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला.जिल्हास्तरीय महात्मा फुले प्रज्ञाशोध परीक्षेत ३०० पैकी २७४ गुण मिळवून जिल्ह्यात ६ वा क्रमांक पटकाविला.राज्यस्तरीय लक्षवेध परीक्षेत ३०० पैकी २५८ गुण मिळवून श्रीरामपूर तालुक्यात २ रा क्रमांक पटकाविला.जिल्हास्तरीय डॉ. हेडगेवार प्रज्ञाशोध परीक्षेत ३०० पैकी २४८ गुण मिळवून जिल्ह्यात १८ वा क्रमांक पटकाविला आहे.
तिला वर्गशिक्षक जालिंदर जाधव व नानासाहेब ताके तसेच रमेश धोंडलकर व आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मिनाताई जगधने,मुख्याध्यापिका सोनाली पैठणे यांनी अभिनंदन केले आहे.