धनगर समाजाचे सिध्देश्वर बापु शिंदे यांना राज्यसभेवर संधी द्यावी ! अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे मागणी


श्रीरामपूर  ( प्रतिनिधी  ) :भारतातील अनेक राज्यांत दांडगा संपर्क असलेले तसेच  भाजपा पक्षाचे गेली पंचवीस वर्षें पासुन काम करणारे सिध्देश्वर बापु शिंदे यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदच्यावतीने केंद्रीय नेतृत्वाकडे करण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय खेमनर यांनी  सांगितले.

महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या दिड ते पावणेदोन दोन कोटी दरम्यान आहे  परंतु लोकसभेला एकही धनगर समाजाचा खासदार  निवडून गेला नाही  एकमेव खासदार  महादेव जानकर यांना उमेदवारी दिली  परंतु जातीयवादाच्या  भवऱ्यामुळे  महादेव जानकर यांचा पराभव झाला   महाराष्ट्र मधून  धनगर समाजाचा एक खासदार  राज्यसभेवर देण्यात यावा  अशी मागणी महाराष्ट्रातून जोर धरत आहे  .देशात जवळपास 14 कोटी पर्यंत   धनगर समाज आहे . असे असताना भाजपा व धनगर समाजासाठी अनेक वर्षांपासून सक्रीय काम करणाऱ्या बापू शिंदे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली तर पक्षाला निश्चितच फायदा होईल.

वनवासी कल्याण आश्रम, भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी, च्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे काम केले.

देशात भटके विमुक्त जाती जमाती आणि पशुपालकांचे   महाराष्ट्र राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक दिल्ली हरियाणा या  राज्यामध्ये  त्यांनी धनगर मेंढपाळ भटके मुक्तांसाठी मेळावा व आंदोलन अधिवेशन घेऊन या उपेक्षित वंचित समाजाला संघटीत करीत आहे. न्याय देण्याचा  प्रयत्न केला.

 शिंदे यांच्या सामाजिक व राजकीय कामाची दखल घेऊन,देशातील 13 संघटना एकत्र येऊन त्यांच्या कडे अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषद या देशव्यापी संघटनेची   राष्ट्रीय अध्यक्ष पदाची  जबाबदारी देण्यात आली आहे.

पक्षाच्या माध्यमातून आंदोलन, मोर्चे, मेळावे तसेच निवडणुकीत सक्रीय सहभाग त्यांचा आहे. त्यांच्या कामाचा अनुभव पहाता बापू शिंदे यांना राज्यसभेवर प्रतिनिधित्व मिळाले तर ते निश्चितच भटके विमुक्त जाती जमाती, उपेक्षित वंचित घटकांना न्याय देतील ! आगामी विधानसभा, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला फायदा होईल. शिंदे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळावी यासाठी लवकरच धनगर व भटके विमुक्त जाती जमातीचे शिष्टमंडळ पक्षश्रेष्ठींची भेट घेणार, अशी माहिती अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष  दत्तात्रय खेमनर यांनी दिली.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post