यासंदर्भात गटविकास अधिकारी प्रविण सिनारे यांना निवेदन दिले आहे. अशोकनगर ते बेलापूर रस्त्याचे सुरु असलेले निकृष्ट दर्जाचे काम त्वरित थांबवावे, कामाच्या दर्जात सुधारणा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांनी दिला आहे.
आमदार लहुजी कानडे यांच्या विशेष निधीतुन बेलापूर अशोकनगर या सुमारे ५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण काम सुरु आहे. रस्त्याच्या कामात काळ्या दगडाची वापरणे आवश्यक आहे. या रस्त्यावरुन अवजड वाहनाची मोठया प्रमाणात वाहतुक होत असते. परंतु, सदर रस्त्याच्या कामामध्ये खडी गारयुक्त आणि मुरुमाचा वापर केला आहे. रस्त्यावरील माती न झाडून घेता त्यावर खडी टाकुन साधा डाबराचा फवारा मारला जात असल्याचा आरोप कारण्यात आला आहे.
रस्त्याचे काम इस्टीमेटप्रमाणे, अटी-शर्तीप्रमाणे न झाल्यास येत्या १० मार्च पासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाच्या कार्यकर्त्यासह 'काम बंद आंदोलन' करण्यात येईल, असा खणखणीत इशारा बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश अमोलिक, 'आरपीआय'चे शहराध्यक्ष सागर साळवे, युवक शहराध्यक्ष मयुर खरात आदींनी दिला आहे.