श्रीरामपूर : महाशिवरात्रीनिमित्त गोंधवणी येथील पुरातन महादेव मंदिरात सम्राट हेल्थ क्लबचे मालक राजू कक्कड व बिट्टू कक्कड यांच्या वतीने शेकडो शिवभक्तांना दुधाचे वाटप करण्यात आले. महादेव मंदिर व पुरातन रामेश्वर मंदिरात विधिवत पूजा अभिषेक करण्यात आला. यावेळी हजारो भक्तांनी महादेवाचे दर्शन घेतले. महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
महाशिवरात्रीनिमित्त भैरवनाथनगर गोंधवणी येथे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. महादेव मंदिर हे प्रसिद्ध असून येथे सम्राट हेल्थ क्लबचे मालक श्री राजूभाऊ कक्कड व बिट्टूभाऊ कड यांच्या वतीने महाप्रसादाचा दुधाचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. हजार ते बाराशे लिटर दुधाचा महाप्रसाद राजू कक्कड व बिट्टू कक्कड यांनी सर्व भाविकांसाठी वाटप केला.
भैरवनाथ येथील सरपंच प्रवीण फरगडे व ज्येष्ठ नेते बाळासाहेब लोंढे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळेस भैरवनाथ मधील ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी बिट्टू ककड व राजू काकडे यांचा सत्कार केला.