यावेळी बोलताना केतन खोरे म्हणाले की, अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर असावे हे सुमारे ५०० वर्षांपासून भारतीयांचे स्वप्न २२ जानेवारीला श्री क्षेत्र अयोध्या येथे होणा-या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठानाने पुर्ण होणार आहे. प्रभागातील नागरीक पुन्हा एकदा दिवाळीची तयारी करत असल्याचे खोरे म्हणाले. प्रभाग १६ मधील साई मंदिर, पुर्णवादनगर ते श्री पावन गणेश मंदिर, लबडे वस्ती या परिसरातून निघालेला शोभायात्रेत महिला भगिनींनी आपल्या घरासमोर, रस्त्यावर सडा-रांगोळी काढून शोभायात्रेचे पारंपारीक पद्धतीने स्वागत केले.
यावेळी शेकडो महिलांनी कलश पूजन करत मोठ्या उत्साहात शोभायात्रेत सहभाग घेतला. यावेळी ढोल ताशा पथक व जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. या शोभायात्रेचे श्रीराम भक्त तुषार चांडवले, नितीन हारदे, चेतन लोंढे, किशोर झिंजाड, दिक्षित सर, विजय शर्मा, अरुण कुलकर्णी, सिद्धांत शर्मा, मनोज होंड, ऋषिकेश पाटील, रामेश्वर होंड, बंडू मंडवे, शुभम चोथवे आदींनी उत्तम नियोजन केले.