श्रीरामपुरातील काळाराम मंदिरात होणार महाआरती ; श्रीरामांचा आवडत्या प्रसादाचे वाटप, फटाक्यांची होणार आतषबाजी : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांची माहिती


श्रीरामपूर : देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. २२ जानेवारीला अयोध्या येथे प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने श्रीरामपुरातील प्रभू श्रीराम पदस्पर्शाने पावन झालेल्या काळाराम मंदिरात दुपारी १२ वाजता २१ विवाहित जोडप्यांच्या हस्ते महाआरती केली जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांनी दिली.

              राम मंदिर बांधणीमध्ये राजकीय पक्ष म्हणून शिवसेना आणि शिवसैनिक तसे हिंदुरुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कार्य अनमोल आहे . अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि शिवसैनिक यांच्या योगदानामुळेच हा सुवर्ण दिवस आज उजाडला आहे.

प्रभू श्रीराम हे वनवासात जाताना श्रीरामपूर मार्गे नाशिकला गेले तसेच मारीच राक्षस याचा वध करण्यासाठी नाशिक वरून ते श्रीरामपूर मार्गे कायटोकगंगा या ठिकाणी गेले असे ऐतिहासिक दाखले सापडतात त्यावेळी त्यांनी काळाराम मंदिर या ठिकाणी वास्तव्य केले. ज्या ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम यांनी वास्तव्य केले त्या-त्या ठिकाणी काळाराम मंदिर आढळते अशा या पुरातन आणि वैभवशाली मंदिरामध्ये ही महाआरतीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सचिन बडदे यांनी सांगितले.

                 सर्व विवाहित जोडप्यांनी आरतीचे सामान व ताट बरोबर घेऊन यावे असे आवाहन कारण्यात आले आहे. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजी आणि प्रभू श्रीरामांचा आवडता प्रसादाचे वाटप यावेळी करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी जोडीने उपस्थित राहावे असे आवाहन काळाराम मंदिराच्या पुजारीन सुमनताई अक्का ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे ,शिवसेना तालुकाप्रमुख लखन भगत, शिवसेना तालुकाप्रमुख राधाकिसन बोरकर ,शहर प्रमुख रमेश घुले, विधानसभा संघटक संजयजी छल्लारे. ,विधानसभा समन्वयक एकनाथ गुलदगड , युवा सेना शहर प्रमुख निखिल पवार ,तालुका संघटक सदाशिव पटारे , किशोर ढोकचौळे , महिला आघाडीच्या कल्पनाताई वैद्य, सौ शारदाताई कदम यांच्यासह सर्व अंगिकृत संघटना ,उपतालुकाप्रमुख उपशहर प्रमुख, युवासेना ,महिला आघाडी ,व्यापारी आघाडी यांच्यातर्फे सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post