इतिहासाच्या पुनरावृत्तीला सुरुवात होत आहे ; रामगिरीजी महाराज


श्रीरामपूर : महाभारताचे युद्ध टाळण्याकरता शांती प्रस्ताव घेऊन गेलेल्या कृष्णाने कौरवांना पांडवांना फक्त पाच गावे द्या, अशी मागणी केली. तेव्हा दुर्योधनाने सुईच्या टोकाएवढी माती सुद्धा देणार नाही, अशी उन्मादी घोषणा केली. पुढे महाभारत झाले, कौरवांचे राज्य ही गेले आणि जीवही गेले, तशाच इतिहासाच्या पुनरावृत्तीला आता सुरुवात होत आहे, असे प्रतिपादन परमपूजनीय महंत रामगिरीजी महाराज यांनी येथे केले.

परमपूजनीय श्री रामगिरीजी महाराज प्रमोद महाजन प्रबोधिनीने आयोजित केलेल्या श्रीराम जन्मभूमी मुक्ती रणसंग्रामाचा समग्र इतिहास या विषयावरील व्याख्यान कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रा.स्व.संघाचे जिल्हा संघचालक श्री भरत निमसे हे होते . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रा. स्व. संघाचे सहसंघचालक किशोर निर्मळ यांच्यासह दत्तात्रयमहाराज बहिरट , प्रमोद महाजन प्रबोधिनीचे देविदासजी चव्हाण , गौतम उपाध्ये , बाळासाहेब खाबिया  ,अशोक उपाध्ये , रविंद्र गुप्ता , संजय दुधडिया , राजेंद्र पाटणी , प्रदीप गांधी , अँड. एपी परदेशी , निरज चंगेडिया  ,तेजस गायकवाड , गिरीश बाठीया  ,दिपक संघवी  , सचिन गुंदेचा  ,किशोर शिंदे  ,बाली बेलदार  ,अमोल कडुस्कर  ,आशिष कोळपकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना रामगिरीजी महाराज म्हणाले की, या हिंदुस्थानात मुस्लीमांनी पाडलेल्या मंदिरांची संख्या ३०  हजार पेक्षा जास्त आहे. त्यांच्याबद्दल हिंदू समाज कुठलीही मागणी केली नव्हती. मात्र प्रभू श्रीराम जन्मभूमी , मथुरा आणि काशी ही देवस्थाने परत करावी अशी मागणी हिंदू समाज त्यावेळेला करत होता. सामोपचाराने प्रश्न सुटला असता व सलोखाही कायम राहिला असता. मात्र, हिंदूंनी लढा करून राम जन्मभूमी मिळवली आहे. काशी व मथुरेचा विषय आता कोर्टात आहे. विजय हिंदूंचाच होणार आहे. विजयाची सुरुवात श्रीराम जन्मभूमीपासून होत आहे. असा विश्वास श्रीरामगिरीजी महाराजांनी यावेळी व्यक्त केला .

 श्रीराम जन्मभूमी मुक्ती रणसंग्रामाचा इतिहास या विषयावर बोलताना विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सहमंत्री दादा वेदक म्हणाले की मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका असे कॉंगेसचे राष्ट्रीय नेते समाजात बोलत होते अशा काळात काँग्रेसला संसदेमध्ये पाशवी बहुमत होते . राजीव गांधींनी मुस्लिमांच्या मतांसाठी शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल संसदेत कायदा करून बदलवीला  अशा प्रतिकूल परिस्थितीत विखुरलेल्या साडेसहाशे पंथ  सांप्रदाय असलेल्या हिंदू धर्मसंसदेने राम जन्मभूमी मुक्ती यज्ञ समिती स्थापन करून विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री अशोकजी सिंघल यांच्या नेतृत्वाखाली लढ्याला सुरुवात केली. पुढे बोलताना श्री दादा वेदक म्हणाले की 1986 साली फैजाबादच्या न्यायालयाने राम मंदिराचे कुलूप काढून हिंदूंसाठी प्रभूश्री रामचंद्र चे दर्शन खुले केले पुढे विश्व हिंदू परिषदेने 1989 मध्ये शीला पूल पूजनाचे अभियान राबवून रामजन्मभूमीच्या ठिकाणी श्रीराम मंदिराचा शीलांन्यास केला .पाच लाख गावांमध्ये शिलापूजनाचे कार्यक्रम झाले. पुढे 90 मध्ये मुलायमसिंग मुख्यमंत्री असण्याच्या काळामध्ये अयोध्येत रक्तरंजीत     कारसेवा झाली आणि कोठारी बंधूंनी बाबरी ढाच्यावर  भगवा फडकवला व आपले बलिदान देवून पहीली कारसेवा यशस्वी केली . दुसरी ६ डिसेंबर १९९२ रोजी दूसरी कारसेवा १९९२ साली झाली या कारसेवेला चार-पाच लाख कारसेवक आयोध्येमध्ये जमले आणि त्यांनी बाबरी मशीद नावाचा वादग्रस्त ढाचा पाडून त्या ठिकाणची जमीन समतल  करून तात्पुरत्या रामललाच्या श्रीराम मंदिराची उभारणी केली . आता त्या रामजन्मभूमीच्या जागेवर भव्य मंदिर भव्य दिव्य मंदिर उभे राहत असून 22 जानेवारीला त्या ठिकाणी राम ललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे . हा हिंदूंच्या क्षात्रतेजातून जगाच्या पाठीवर उगवणारा सोन्याचा दिवस आहे .तो सर्व हिंदूंनी दिवाळी सारखा साजरा करावा असे आवाहन दादा वेदक यांनी यावेळी केले .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश चित्ते यांनी करून श्रीरामजन्मभूमी मुक्ती रणसंग्रामाचा समग्र इतिहास या विषयावरील दादा वेदकांच्या व्याख्यानाचे प्रमोद महाजन प्रबोधिनीने का ? आयोजित केले याविषयीची पार्श्वभूमी विशद केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेश सोनवणे  यांनी केले .यावेळी आभार निरज चंगेडिया यांनी मानले. या प्रमोद महाजन प्रबोधिनीच्या कार्यक्रमास शहरातील व्यापारी, डॉक्टर, वकील, व्यावसायिक, नोकरदार नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post