श्रीरामपूर : द राईट ऑर्डर (बंगळुरू), यादवेंद्र युनिव्हर्स व राधा रायटिंग सर्व्हिसेसच्या संयुक्त विद्यमाने यादवेंद्र गोपाळ सपकार लिखित ‘शिवयज्ञ : शिवरुद्र आणि सुरतेचा खजिना’ या त्रिखंडीय ऐतेहासिक मालिकेतील पहिले पुस्तक प्रकाशित झाले.
शिवकालीन संदर्भाच्या धाग्याला पकडुन हे पुस्तक लिहिणारे यादवेंद्र हे गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल माध्यमामध्ये लिखाण करत असून त्यांनी आतापर्यंत विविध विषयांवर २५० पेक्षा जास्त साहित्य डिजिटल व्यासपीठांवर लिहिले आहे. तसेच त्यांच्या राधा रायटिंग सर्व्हिसेस या संस्थेमार्फत पटकथा लेखन, संवाद लेखन, कथा लेखन इत्यादी प्रकल्पही पूर्ण केले जातात.
सदर पुस्तक आतापर्यंत लाखो लोकांनी आवडीने वाचलं आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी काही रक्कम ही विविध वर्गातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी देण्याचा निर्णय यादवेंद्रने घेतला असून जास्तीत जास्त लोकांनी हे पुस्तक अमेझॉन.इन या संकेतस्थळावर जाऊन विकत घ्यावे, असे आवाहन करण्यात आलं आहे.