अश्वारूढ मूर्ति छत्रपती शिवाजी महाराज चौकातच राधाकृष्ण विखेंचे युवा मोर्चाला आश्वासन


श्रीरामपूर : श्रीरामपुर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकातच बसवण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे यांनी भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

अनेक लोकांनी राजकारण करूनही कोणतीही अमलबजावणी केली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसाठी हिंदुत्ववादी संघटना व कार्यकर्त्यांनी 40 वर्ष आंदोलन केले. अनेक लोकांनी त्याचे फक्त राजकारणच केले. पण आता भारतीय जनता पक्षाचे विधानसभा प्रमुख जिल्ह्याचे सरचिटणीस नितीन दिनकर   व भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी लवकरच हा प्रश्न सोडविण्याचा विडा उचलला. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन त्यांच्या कडुनही अश्वारूढ मूर्ती साठी हिरवा कंदील घेतला.

जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून 1 कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला. त्यासाठी युवा मोर्चा श्रीरामपूर शहराकडून ना. राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभा प्रमुख नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांचाही सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. यावेळेस विखे पाटलांनी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रुपेश हरकल यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल आणि अतिरिक्‍त निधी लागल्यास निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासनही दिले.

 याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रुपेश हरकल, तालुका सरचिटणीस दत्ता जाधव, योगेश ओझा, युवा मोर्चाचे महेंद्र पटारे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब हरदास, सुबोध शेवतेकर, लखन उपाध्ये, पंकज करमासे, रुद्रप्रताप कुलकर्णी, तेजस उंडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post