श्रीरामपूर : सार्वजनिक बांधकाम श्रीरामपूर उपवीभागाचे उप-अभियंता नितिन गुजरे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 याचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कायदेशीर करावी करावी, अशी तक्रार छावा ब्रिगेड संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजेश शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली
राजेश शिंदे यांनी केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे कि, उप अभियंता नितिन गुजरे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 याचे उल्लंघन केले आहे. कुठलेही शासकीय कर्मचारी यांना 20 हजार पुढील वस्तु घ्यायची असेल तर त्यांना त्यांच्या वरिष्ठांची अधिकाऱ्याची संमती घ्यावी लागते. परंतु, श्री गुजरे यांनी कुठलेही परवानगी न घेता अंदाजे 45 ते 55 लाख रुपये किमतीची जीप कंपनीची meridian फोर व्हीलर घेतली आहे. तसेच त्यावरती लोन जरी घ्यायचे असेल तरी वरिष्ठ अधिकाऱ्याची संमतीची लेखी स्वरुपात परवानगी लागते. असे कुठलेही बाबी श्री गुजरे यांनी केलेले नाही.
उप अभियंता श्री गुजरे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करवी अन्यथा छावा ब्रिगेडच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राजेश शिंदे दिला आहे.