यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख रमेश घुले यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी करून सांगितले की, श्रीरामपूर शहर हे पहिल्यापासून मोठ्या रस्त्यांसाठी आणि सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, मागील काही वर्षापासून मेनरोड, छत्रपती शिवाजी रोड, गोंदवणी रोड, संगमनेर रोड, नेवासा रोड या रस्त्यावर वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. चार चाकी वाहने तर सोडाच दुचाकी वाहनांनी तसेच छत्रपती शिवाजी रोड या रस्त्यावर तर पायी चालणे सुद्धा अवघड झाले आहे. ऐवढी दयनीय अवस्था मागील अनेक वर्षापासून श्रीरामपूरची झाली नव्हती.
प्रामुख्याने पार्किंग नसलेले कॉम्प्लेक्स व त्यांनी मोठमोठ्या संस्थेंना भाड्याने दिलेले गाळे, तसेच श्रीरामपूर शहरातील मोक्याच्या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या हातगाड्या, टपऱ्या, गांधी पुतळ्यापाशी सुद्धा दोन गाड्या उभ्या असतात. तसेच अनेक दुकानदारांनी दुकानासमोर केलेल्या अतिक्रमने हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी त्वरित या सर्व गोष्टीवर कारवाई करावी. परंतु, नगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांची वाहतूक शाखा हे येणाऱ्या ग्राहकांवरच कारवाई करत असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक ग्राहक आणि चांगल्या व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.
नगरपालिकेने या सर्व गोष्टींवर त्वरित कारवाई करावी नाहीतर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना रस्त्यावर उतरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व गोष्टीचा न्यायनिवाडा शिवसेना स्टाईलने करेल, असा इशारा दिला. हे निवेदन देताना शिवसेना शहर प्रमुख रमेश घुले ,युवा सेना शहर प्रमुख निखिल पवार , उपशहर प्रमुख रोहित भोसले विभाग प्रमुख सुनील फुलारे, घोगरे मामा हे उपस्थित होते.