![]() |
सामाजिक वनीकरणच्या पुणे मुख्यालयातील प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिता सिंग यांना राजेश बोरुडे यांनी निवेदन देऊन आरएफओ सुनिल मेहेरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. |
अहमदनगरच्या विभागीय सामाजिक वनीकरण कार्यालयाकडून जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण परीक्षेत्र कार्यालयातर्गत कामांची नियमित तपासणी होत नसल्याने मुजोर आरएफओ मनमानी कारभार करत आहेत. विभागीय वन अधिकारी सचिन कंद वन परीक्षेत्र अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करत नाही. लोणी स्थित राहाता सामाजिक वनीकरण कार्यालय परिसरात जीवंत वृक्षे जाळून त्यांची कत्तल करून लाखों रुपयांचा अपहार कारण्यात आला. राजेश बोरुडे यांनी आरएफओ सुनिल मेहेरेंकडे वृक्षतोड व इतर अनेक मुद्द्यांची माहिती अधिकरांतर्गत माहिती मागितली. परंतु, भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून सुनिल मेहेरेंनी माहिती दिली नाही. अपिल सुनावणीत माहिती देण्याचे आदेश देऊनही वन परीक्षेत्र अधिकारी सुनिल मेहेरेंनी राजेश बोरुडे यांना माहिती दिली नाही. माहिती दिली तर भ्रष्टाचार बाहेर येऊन गुन्हा दाखल होईल या भीतीने आरएफओ सुनिल मेहेरे कोणतीही माहिती देत नाही.
वृक्षतोड करून कत्तल केल्याप्रकरणी आरएफओ सुनिल मेहेरे व इतरांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, फौजदारी प्रक्रिया सहिंता 1973 चे कलम 197 अन्वये 'साईकिरण टाइम्स'चे संस्थापक राजेश बोरुडे यांनी वकिलामार्फत विभागीय वन अधिकारी सचिन कंद, आरएफओ सुनिल मेहेरे, प्रधान मुख्य वन संरक्षक सुनिता सिंग यांसह संबंधिताना नोटीस बजावली आहे.