उप-अभियंता नितीन गुजरे यांनी श्रीरामपुर येथे च भ्रष्टाचार करण्यासाठी तळ ठोकून कार्यरत राहिले उपविभागात कार्यरत असताना ठेकदारासोबत हात मिळवणी करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला त्यांच्या मर्जीतील ठेकेदारास कामे देऊन नित्कृष्ठ दर्जाची कामे केली थातूरमातूर कामे करून बिले काढण्यात आली अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची विशेष बाब म्हणून त्यांना श्रीरामपूर येथेच उपविभाग उपअभियंता म्हणून कार्यरत ठेवले श्री नितीन गुजरे यांच्या माध्यमातून झालेल्या कामाची आपल्या स्तरावरून आमच्या समक्ष कोर टेस्टिंग करण्यात यावी व संबंधित अधिकाऱ्यावर दहा दिवसाच्या आत कडक कारवाई करण्यात यावी व त्यांची जिल्हा बाहेरील अथवा वाडा जिल्हा पालघर या ठिकाणी त्वरित रवानगी करण्यात यावी अन्यथा छावा ब्रिगेड च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा छावा ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष श्री विश्वनाथ वाघ,प्रदेश महासचिव राहुल रेले,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे यांनी निवेदन दिले.
श्रीरामपूर : श्रीरामपुर जिल्हा अहमदनगर येथे अनेक वर्षापासून शाखा अभियंता म्हणून कार्यरत असणारे परंतु राजकीय हस्तक्षेप असल्याने उपअभियंता म्हणून कार्य करणारे व त्यांची वाड़ा जिल्हा पालघर या ठिकाणी नियुक्ती १ वर्षापासून देण्यात आली परंतु त्या ठिकाणी हजर न होता श्रीरामपुर लाच उपअभियंता म्हणून कार्यरत राहून अनेक कामामध्ये तफावत ठेवून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून जनतेच्या पैसावर डल्ला मारणाऱ्या श्री.नितिन गुजरे यांच्यावर कड़क कार्यवाही करावी, वाडामध्ये तत्काळ बदली करण्यात यावी, अन्यथा छावा ब्रिगेडच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा छावा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्री विश्वनाथ वाघ, प्रदेश महासचिव राहुल रेले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे यांनी दिला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.