श्रीरामपूर : सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अविनाश भोसले यांना "उत्कृष्ट छायाचित्रकार" या सन्मानाने गौरविण्यात येणार आहे तसेच त्यांना ''क्रांतीगुरु लहुजी साळवे समाजभुषन" हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, भारतीय लहुजी सेनेच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
३० नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव, हनिफभाई पठाण कायदेशिर सल्लागार अॅड. रमेश कोळेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात येणार आहे.