गणित विज्ञान प्रदर्शनात प्रणवी वारे श्रीरामपूर तालुक्यात प्रथम


श्रीरामपूर : येथील हिंद सेवा मंडळाच्या भि.रा.खटोड कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी कु.प्रणवी प्रवीण वारे हिने श्रीरामपूर येथे आयोजित गणित विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

येथील सेंट झेवियर स्कूल मध्ये गणित विज्ञान संघटनेचे तर्फे आयोजित प्रदर्शनात तिने आपले 'स्मार्ट हाउस' हे उपकरण मांडले होते. पाऊस आल्यावर होणारी धावपळ कमी करण्यासाठी अटल टिंकरींग लॅबमधील

सेंसरच्या साहाय्याने स्वयंचलित छत उभं करण्याचे प्रात्यक्षिक तिनं दाखविले, परिक्षकांची वाहवा तर मिळवली तसेच पहिला क्रमांक पटकावला आहे

या प्रदर्शनास प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच गटशिक्षणाधिकारी व गणित विज्ञान संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पासाठी तिला अजय पुंड श्रीमती राणी शेटे सौ शुभांगी गटणे यांचे मार्गदर्शन लाभले.

हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा शिरीष मोडक, कार्याध्यक्ष ॲड अनंत फडणीस मानद सचिव संजय जोशी चेअरमन दत्तात्रय साबळे, डॉ ज्योत्स्ना तांबे सहसचिव रणजित श्रीगोड,अनिल देशपांडे व कार्यकारणी सदस्य अशोक उपाध्ये प्राचार्या सौ विद्या कुलकर्णी,उपमुख्याध्यापक विठ्ठल ढगे पर्यवेक्षिका अनिता शिंदे वर्गशिक्षक व सेवक प्रतिनिधी आदिनाथ जोशी तसेच सर्व शिक्षक व सेवक यांनी अभिनंदन केले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post