श्रीरामपुरात कावड यात्रेकरुंवर मुस्लिम गुंडाचा हल्ला ; श्रीरामपुरचा वॉर्ड नंबर दोन परिसर पाकिस्तानात आहे का? मुस्लिम गुंडांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलन : भाजपाचे प्रकाश चित्ते यांचा इशारा


श्रीरामपूर ( साईकिरण टाइम्स ) राहुरी तालुक्यातील कनगरच्या गावदेवीच्या यात्रेसाठी गंगेचे पाणी पुणतांब्याला आणायला चाललेल्या कावड यात्रेकरुंवर गोंधवणी रोडवर असलेल्या सिंधी मंदिरासमोर मुस्लिम गुंडांनी हल्ला केला. या हल्ल्यातील आरोपींना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी केली आहे.

टाटा छोटा हत्तीच्या दोन गाड्यांमधून साधारण ५० युवक कावडीने पाणी आणण्यासाठी पुणतांब्याला निघाले होते. त्यातील एका गाडीतील स्पीकर वर 'बनायेंगे मंदिर' हे गाणे वाजत होते. त्याचा राग येऊन मागून येणाऱ्या गाडीवर सिंधी मंदिरासमोर मुस्लिम गुंडांनी हल्ला केला असे, या पत्रकात स्पष्ट करून पुढे म्हटले आहे की, वॉर्ड नंबर दोन परिसर हा काही पाकिस्तानात आहे काय? की  श्रीरामाचे गाणे ही या परिसरात वाजवले जाऊ शकत नाही का? असा प्रश्न विचारून या हैदोस घालणाऱ्या मुस्लिम गुंडांना पोलिसांनी गुंडांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी या पत्रकात करण्यात आली आहे.

घटनेप्रसंगी मुस्लिम गुंडांच्या जमावाने काही कावडवाल्यांना मारहाण केली, तेव्हा वेळेतच श्रीरामपुरचे पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यामुळे जमाव पळून गेला. पोलिसांनी कावड यात्रेकरूंची गाडी पुढे काढून दिली. या ठिकाणी जमा झालेल्या जमावातील गुंडांना ताब्यात घेणे गरजेचे होते व कावड यात्रेकरूंना पोलीस स्टेशनला आणून त्यांची फिर्याद घेणे गरजेचे होते. मात्र, पोलिसांनी तसे केले नाही, असे का केले नाही? असा सवाल चित्ते यांनी केला आहे.

पोलिसांकडून सीसीटीव्हीचे कारण पुढे केले जात आहे. मात्र, ज्या-ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत अशा ठिकाणी घडलेल्या गुन्ह्यांचा पोलीस तपास करत नाही का? की तपास बंद करतात? सीसीटीव्ही फुटेजचे कारण सांगून पोलिसांनी या गावात दहशत माजवणाऱ्या मुस्लिम गुंडांना पाठीशी घालू नये अन्यथा, या आरोपींना अटक करण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा या पत्रकात देण्यात आला आहे.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post