साईकिरण टाइम्स | शालेय आठवणींना उजाळा म्हणजे माजी विद्यार्थीनी मेळावा : प्रा.शिरिष मोडक : अभूतपूर्व उत्साहात बालिका शाळेत माजी विद्यार्थीनी मेळावा संपन्न


श्रीरामपूर : आपल्या शालेय जीवनात अनेक अविस्मरणीय घटना घडलेल्या असतात. आपले मार्गदर्शक गुरूजन शिक्षकांनी आपल्या जीवनाला दिशा दिलेली असते, शाळा म्हणजे अनंत आठवणी त्या सर्व आठवणींना उजाळा देण्यासाठी असा मेळावा अत्यंत आवश्यक असतो, असे प्रतिपादन हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा शिरीष मोडक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात  केले.


येथील भि.रा खटोड कन्या विद्यालयात हिंद सेवा मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आला होता अभूतपूर्व उत्साहात मेळावा संपन्न झाला.त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी,सह सचिव रणजित श्रीगोड, नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,संजय छल्लारे,सौ ज्योती कुलकर्णी ,दिलीप शहा चेअरमन दत्तात्रय साबळे डॉ सौ ज्योत्स्ना तांबे, प्राचार्या सौ विद्या कुलकर्णी आदी उपस्थित होते.


यावेळी बोलतांना हिंदसेवा मंडळाचे संजय जोशी म्हणाले की हिंद सेवा मंडळ या संस्थेने अनेक चढउतार पाहिले अनेकांच्या जीवनात शिक्षण रुपी मोलाची भर घातली व आजही हे कार्य अविरत चालू असून संस्था ताठ मानेने उभी आहे. प्रास्ताविक करताना विद्यालयाचे चेअरमन  दत्तात्रय साबळे म्हणाले की येणाऱ्या भविष्यात विद्यार्थिनींना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कॉमर्स व सायन्स ज्युनियर कॉलेज सुरू करण्याचा मानस आहे तसेच जुनियर कॉलेजच्या चेअरमन सौ ज्योत्स्ना तांबे यांनी सर्व माजी विद्यार्थिनींना मेळाव्यासाठी शुभेच्छा दिल्या व मान्यवरांचे स्वागत केले.


या मेळाव्याची सुरूवात सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक शिक्षिका आणि सेवक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींच्या राष्ट्रगीत महाराष्ट्र गीत व प्रार्थना ,कवायतीने झाली व माजी विद्यार्थिनींनी भोंडल्याची गाणी अभिनयासह सादर करून विद्यार्थी जीवनाचा आनंद घेतला.भोंडला गाणी अवधूत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कु ईश्वरी नायक व विद्यार्थ्यांनी यांनी सादर केली.सूत्रसंचालन सौ वृषाली कुलकर्णी व सौ सोनाली पुंड यांनी केले. भोंडला म्हणजे बालिका याची खुप वर्षांनी पुन्हा अनुभूती घेतली.


या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थिनींमध्ये न्यायाधीश , पीएसआय  वकील ' डॉक्टर, इंजिनियर, कीर्तनकार गृहिणी आदी रूपाने विविध पदांवर कार्यरत असणार्‍या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या प्रसंगी सर्व उपस्थित विद्यार्थिनींना विद्यालयाकडून स्मृतिचिन्ह भेट देण्यात आली प्रातिनिधिक न्यायाधीश सौ संगिता अजमेरा पहाडे यांचा सत्कार करण्यात आला.


 या कार्यक्रम प्रसंगी  सौ .अनिता जोशी , सौ .वैशाली जोशी . सौ योगिता कुलकर्णी ,सौ इंदुमती डावखर, चंद्रकांत सगम, प्रा डॉ.गोरख बारहाते . दत्तात्रय काशीद, पत्रकार पद्माकर शिंपी, बाळासाहेब भांड, अनिल पांडे ,बोरसे मामा,सेवक प्रतिनिधी

कल्याण लकडे, योगेश देशमुख  व बी.यु.कुलकर्णी ,सुनील साळुंखे,श्रीमती सुजाता मालपाठक, शरद तात्या लोंढे, कारभारी काणे, बाळासाहेब गोराणे, सतीश फुणगे भूषण गोपाळे, विठ्ठल भांगरे, दत्तात्रय कांबळे, विठ्ठल ढगे सौ अनिता शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच सेवानिवृत्त शिक्षकांपैकी अनिल कुलकर्णी, कविता कुलकर्णी, अरविंद वाणी ,डी‌ पी. जोशी मुकूंद टंकसाळे,

सौ रेणुका पारनाईक सौ विजया तागड  सौ पुष्पा पोखरकर, वसंत मोरे प्रकाश कदम ,श्रीकृष्णा भालेराव, श्रीगिरीधर सोनवणे दिपक कुलकर्णी आबासाहेब कापसे, रंगनाथ मेंगदे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी दुसऱ्या सत्रात प्रश्नोत्तरे व संवाद चर्चा रंगली सेवा निवृत्त शिक्षकांनी सहभाग नोंदवला.प्रातिनिधिक माजी विद्यार्थीनी मनोगते  व्यक्त केली यामध्ये सौ. राऊत सौ. पवार सौ. यादव सौ राठोड,सौ रमा धिवर व महाराष्ट्रातील प्रसिद्ध महिला किर्तनकार आणि माजी विद्यार्थिनी सौ. जयश्रीताई तिकांडे यांनी प्रतिनिधी स्वरूपात आपली मनोगते व्यक्त केली.स्थानिक समन्वय समितीच्या जयाताई जगताप, मंजुश्री गलांडे स्वाती छल्लारे व सर्व सहकारी यांनी कृतज्ञता नृत्य सादर केले कु आर्या बडदे व निलांबरी अंभोरे यांच्या पसायदानाने सांगता झाली. सकाळ सत्राचे सूत्रसंचालन प्रा .आदिनाथ जोशी व सतीश म्हसे यांनी तर दुपार सत्राचे सूत्रसंचालन सौ ज्योती भळगट श्रीमती सुजाता शेंडगे सौ गलांडे आदींनी केले तर आभार विठ्ठल ढगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी विद्यार्थीनी मेळावा समन्वय समिती सर्व सदस्य तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक सेवक वृंद यांनी परिश्रम घेतले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post