वरद कुंभकर्णच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर महाराष्ट्राचा मध्य प्रदेशवर २२ धावांनी विजय


मडगाव, गोवा (गौरव डेंगळे): येथील के एस सी आर क्रिकेट मैदानावर टी ट्वेंटी क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने १८ राज्यांचे निमंत्रित क्रिकेट स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे.

आज झालेल्या पहिल्या सामन्यात वरद कुंभकर्णच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने मध्य प्रदेशवर २२ धावांनी विजय मिळवला.नाणेफेक जिंकून मध्यप्रदेश संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.महाराष्ट्र संघाने निर्धारित १५ षटकांमध्ये ५ गडी बाद १०८ धावा फटकावल्या. महाराष्ट्र संघाकडून वरदने नाबाद २५,आरमने १७ धावा तर सर्वेशने १२ धावांचे योगदान दिले.मध्यप्रदेश संघाकडून राहुल व रोहितने १-१ गडी बाद केला.१०९ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मध्य प्रदेशचा संघ वरद व आराम यांच्या भेदक माऱ्यापुढे टिकाऊ धरू शकला नाही व संघ १२ षटकात ८६ धावांवर गारद झाला.वरद व आराम प्रत्येकी ३-३ गडी बाद केले तर मितांश व या दोन्ही प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

मध्यप्रदेश संघाकडून रोहितने सर्वाधिक १२ धावांची योगदान दिले.२५ धावा व ३ गडी बाद करणारा वरद सामन्याचा सामनामानकरी ठरला. साखळीतील दुसऱ्या सामनात महाराष्ट्राची गाठ पडेल ती बलाढ्य छत्तीसगड संघाबरोबर.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post