सामाजिक कार्यकर्ते जोएफ जमादार समाजरत्न पुरस्काराने सन्मानीत


श्रीरामपूर : येथील जे.जे. फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष, समाजवादी पक्षाचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते जोएफभाई जमादार यांचा पुणे येथील जनशक्ती विकास मंच या सामाजिक संस्थेकडून समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला.

समाजातील विविध ज्वलंत समस्या प्रश्नी सातत्याने आवाज उठवून उपेक्षित आणि दुर्लक्षितांबरोबरच जनसामान्यांना त्यांचे न्याय,हक्क मिळवून देण्याकामी श्री.जमादार यांचा सदैव नेहमीच सिंहांचा वाटा असतो,समाजातील अनेक ज्वलंत समस्यांप्रकरणी धरणे आंदोलने,उपोषणे आदि मार्गाने संघर्ष करत जनसामान्यांना त्यांचे न्याय, हक्क मिळवून देण्याकामी ते सदैव कार्यरत असतात,त्यांच्या अशा या परोपकारी निर्पेक्ष कार्याची दखल घेऊन पुणे येथील जनशक्ती विकास मंच या सेवाभावी संस्थेकडून श्री.जमादार यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांच्या या सन्मानबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post