यासंदर्भात छावा मराठा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण कोल्हे यांनी पुणे मुख्यालयातील प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिता सिंग यांना निवेदन दिले.
सामाजिक वनीकरण परीक्षेत्राचे श्रीरामपूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी जयवंत वलवे व वनपाल एम. डी. कोळी यांनी मोठा भ्रष्टाचार करून पैसे वाटप केले असल्याची तक्रार केली व संबंधित पुरावे देऊनही विभागीय वन अधिकारी सचिन कंद यांनी त्यांची पाठराखण केली व त्यांना अभय दिले. दोषींवर कोणतीही करावाई केली नाही. विभागीय वन अधिकारी सचिन कंद व सहाय्यक वनसंरक्षक परवीन पठाण भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असून दोषीवर कोणतीही कारवाई करत नाही व भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना चालना देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अहमदनगर सामाजिक वनीकरण विभागाला २०२० ते आजअखेरपर्यंत देण्यात आलेल्या निधी संदर्भात झालेल्या कामांची चौकशी करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.