श्रीरामपूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा : शिवसेनेची मागणी



श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुका त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करा, अशा मागणीसाठी श्रीरामपूर शिवसेने तर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळेस शिवसेनेतील सर्व आजी-माजी पदाधिकारी जेष्ठ शिवसैनिक महिला आघाडी यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी सांगितले की, श्रीरामपूर तालुक्यात भीषण अवस्था आहे सर्व शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे तहसीलदार साहेब यांनी लवकरात लवकर श्रीरामपूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी प्रामुख्याने केली.

त्यानंतर संजयजी छल्लारे यांनी भाषणामध्ये शासनाने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा नाहीतर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असे आव्हान केले आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार किंवा खासदार यांनी तालुक्याच्या प्रश्नात अजिबात लक्ष घातले नाही त्यामुळे त्या दोघांचाही निषेध या वेळेस त्यांनी केला.

शिवसेनेचे नेते सचिन बडदे यांनी भाषणात असे सांगितले की सर्वप्रथम मराठा बांधव आणि महिलांवर सरकारने जो लाठी हल्ला केला त्याचा शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करत आहोत त्यानंतर त्यांनी सांगितले की मागील वर्षी जो ओला दुष्काळ पडला होता त्याचा पंचनामा करून त्याचेही अनुदानाचे पैसे अजून शेतकऱ्यांना भेटले नाही याही वर्षी दुष्काळाची भीषण संकट आहे त्यामुळे तहसीलदार साहेब यांनी वरती कळवून लवकरात लवकर श्रीरामपूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा दुष्काळग्रस्त तालुका जाहीर झाल्याने फायदा असा होतो की शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे विनाशरथ जमा करावे लागतात तसेच या सरकारला महिनाभरही झाला नाही अजून दुष्काळ पडला आहे तर त्यांनी मोठ्या प्रमाणात बाहेर नियमनही चालू केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर तीनही बाजूने मोठे संकट आले आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर विजेचे संकट दूर करावे तसेच शेतकऱ्यांना दिवसा लाईट द्यावी अशी प्रमुख मागणी यावेळेस त्यांनी केली.

यावेळेस शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सदा कराड,  राधाकिसन बोरकर ,शेखर दुबया ,अतुल शेटे, अशोक थोरे प्रदीप वाघ याच्यासह अनेक मान्यवरांचे भाषण झाले.यावेळी लखन भगत, निखिल पवार, सुधीर वायखिंडे, किशोर ढोकचौळे, रामा अग्रवाल, भगवान उपाध्ये ,तेजस बोरावके ,अरुण पाटील, यासीन सैय्यद, रमेश घुले, रोहित भोसले, शिवा पानसरे, महंत यादव ,विजय बडाख, सौ शारदा ताई कदम, बाळासाहेब गायकवाड, प्रतीक यादव ,सिद्धांत छल्लारे ,उमेश छल्लारे, रोहित नाईक, प्रमोद गायकवाड सर, यांच्यासह अनेक मान्यवर शिवसैनिक आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post