अहमदनगर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा : माजी खा भाऊसाहेब वाकचौरे


अहमदनगर : अहमदनगर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या प्रमुख मागणीसह नगर जिल्ह्यातील वाढलेले प्रचंड भारनियमन, गोदावरी डावा उजवा कालवा आवर्तन पुन्हा सुरू करण्याबाबत, निळवंडे चा डावा कॅनलला पाणी सोडणे, दूध दर वाढ, शेतकऱ्यांची वीज संकट दूर करावे, अशा प्रमुख मागण्यासह माजी खा. भाऊसाहेब वाघचौरे यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळासह अहमदनगर या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना या सर्व मागण्या फार गरजेचे आहेत शासन दरबारी त्याचे नक्कीच पाठपुरावा करू तसेच मागील वर्षी जे ओला दुष्काळ पडला त्याच्या अनुदानाचे पैसे ज्या लोकांना भेटले नाही त्याचा व्यवस्थित डाटा आमच्याकडे द्यावा आजही त्या लोकांना आम्ही ते पैसे उपलब्ध करून देऊ अशा आश्वासनही त्यांनी दिले.

 यावेळी मा. भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे ,शिवसेना नेते सचिन बडदे, तालुकाप्रमुख राधाकिसन बोरकर, बेलापूर शहर प्रमुख लखन भगत, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे ,रामा सातपुते सदाशिव पटारे , आबासाहेब ढोकचावले, राजेंद्र भगत ,प्रवीण कोकाटे, प्रवीण गोरे अशोक सातपुते अशोक सातपुते , संदीप गुंड सोमनाथ धाडगे. यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post