'लोडशेडिंग'मुळे श्रीरामपूरकर हैराण ; भारनियमन रद्द करा अन्यथा आंदोलन : समाजवादी पक्षाचा इशारा


राजेश बोरुडे | साईकिरण टाइम्स 

श्रीरामपूर : श्रीरामपुरात गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता भारनियमन सुरु केल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या प्रश्नावर नेहमी आवाज उठवणारे समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी 'महावितरण'च्या या मनमानी कारभाराला जाब विचारत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. महावितरणकडून होत असलेले भारनियमन त्वरित रद्द करण्याची मागणी 'समाजवादी'कडून करण्यात आली आहे.

  समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्यासह  असंख्या नागरिकांनी सोमवारी (दि.४) 'महावितरण'चे कार्यकारी अभियंता भंगाळे यांना यासंदर्भात निवेदन देऊन श्रीरामपुरात सुरु असलेले अन्यायकारक लोडशेडिंग रद्द करण्याची मागणी केली आहे.

 वीजेच्या अचानक झालेल्या अन्यायकारक भारनियमनामुळे शहरातील जनसामान्यांसह व्यावसायिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. सध्या महावितरण वीज कंपनीकडून श्रीरामपूर शहरात तब्बल ९ तासांचे वीज भारनियमन केले जात आहे, हे वीज भारनियमन वीज ग्राहकांवर अन्याय आहे. यामुळे शहरातील जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नळाला पाणी येण्याच्या वेळी नेमकी वीज गायब असते, त्यामुळे पाणी असुनही ते भरता येत नाही. पाऊस नसल्याने उन्हाळ्याप्रमाणे प्रचंड प्रमाणात उकाडा निर्माण झाला आहे.  हवेसाठी पंख्यांची आवश्यकता भासत आहे. डासांची उत्पत्ती देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.  वीजेवर अवलंबून असलेल्या पीठची गिरणी, लॅबोरेटरी, सेतुसेवा कार्यालय, वाहन टायर पंक्चर दुकान, लॉंड्री आदि प्रकारच्या अनेक व्यावसायिकांना देखील आपले व्यावसाय करणे जिकरीचे झाले आहे.  दिवसातून अनेक वेळा वीज गायब होत असल्याने व्यवसाय करणे अवघड झाले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

   यावेळी समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार, तमन्ना पवार, जाकीर शहा, फय्याज बागवान, सलमान पठाण, सलीम कुरेशी, युनुस शेख, रियाज सय्यद, रऊफ शेख, जावीद शेख, अब्दुल सय्यद,अयाज अत्तार, चंद्रकांत परदेशी, दानिश शेख,नजीर अत्तार आदि उपस्थित होते.



Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post