राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून रामराव आदिक पब्लिक स्कूल येथे कबड्डी,व्हॉलिबॉल व क्रिकेट या खेळांचे प्रत्येकी ३-३ सामन्याची मालिका न्यू इंग्लिश स्कूल श्रीरामपूर संघासोबत आयोजित करण्यात आली होती. ही मैत्रीपूर्ण सामन्यांची मालिका आयोजित करण्याचं मुख्य उद्देश्य म्हणजे प्रत्येक भारतवासीयांना राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व अवगत व्हावं तसंच जास्त युवकांनी खेळाकडे एक करियर म्हणून बघावं यासाठीच ही मालिका आयोजित करण्यात आली. दोन्हीही संघांनी या मैत्रीपूर्ण मालिकेमध्ये आपले सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले. पण आपल्या कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर या मित्रपूर्ण मालिकेमध्ये रामराव आदिक पब्लिक स्कूल विजयी ठरले.
दोन्ही संघांना क्रीडा मालिके नंतर शाळेचे प्राचार्य श्री प्रदीप गोराणे, क्रीडा प्रशिक्षक श्री गौरव डेंगळे, श्री नितीन गायधने, श्री पोपटराव बनकर,समन्वयक मुंडलिक, क्रीडा शिक्षक कहांडळ,खंडागळे अडांगळे व उंडे तसेच आदी मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.