श्रीरामपूर तालुक्यातील मागील वर्षीच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर भारत राष्ट्र समितीच्या वतीने आंदोलन करुन तहसीलदार श्री.मिलींदकुमार वाघ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, पुंजाहरी शिंदे, हिम्मतराव धुमाळ, नाना पाटील, ॲड्.सुभाष चौधरी, भाऊसाहेब हळनोर, सौ.मंजुश्री मुरकुटे, किशोर बनसोडे, सोन्याबापू शिंदे, दशरथ पिसे, आबासाहेब गवारे, विरेश गलांडे, आदिनाथ झुराळे, बाबासाहेब आदिक, यशवंत रणनवरे, ॲड्.उमेश लटमाळे, ॲड्.पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र तोरणे, रोहन डावखर, हरिदास वेताळ, गणेश भाकरे, मयुर पटारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे म्हणाले की, यावर्षी पाऊस नसल्याने अवर्षणाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या नुकसान भरपाईची रक्कम मिळाल्यास काही प्रमाणात दिलासा मिळेल. तरी शासनाने तातडीने नुकसान भरपाईची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना अदा करण्याची कारवाई करावी, अशी मागणी श्री.मुरकुटे यांनी केली. यावेळी नाना पाटील, गणेश छल्लारे, गणेश भाकरे, राजेंद्र बनसोडे आदींची भाषणे झाली.
निवेदन देतेवेळी दत्तात्रय नाईक, शिवाजी मुठे, अंबादास आदिक, तात्यासाहेब चौधरी, सोपानराव नाईक, प्रफुल्ल दांगट, संजय लबडे, प्रविण फरगडे, राजेंद्र लांडगे, वसंत देवकर, अमोल ढोकचौळे, रंगराव रंजाळे, रामनाथ सांगळे, शिवनाथ आव्हाड, नारायणराव बडाख, दिपक झुराळे, आशिष दोंड, प्रविण गवारे, सुनिल बोडखे, शिवाजी शिंदे, संदीप शेरमाळे, भागवत रोकडे, विश्वास क्षीरसागर, राजीव गिऱ्हे, राजेंद्र लांडगे, प्रदीप शिंदे, दत्तात्रय राऊत, अशोक पारखे, विराज आंबेकर, अनिल कुलकर्णी, विशाल धनवटे, बाळासाहेब यादव, दादासाहेब खर्डे, विजय ताके, शिवाजी आढाव, भाऊसाहेब दोंड, विशाल जाधव, जमशेद पटेल, अच्युतराव बडाख, जयेश परमार, सौ.अर्चना भाऊसाहेब आसने, शब्बीर सय्यद, बाळासाहेब शिंदे, नानासाहेब निकम, संजय बडाख, कचरु औताडे, रविंद्र ढेपे, सुनिल येसेकर, बाळू शेलार, भैरव कांगुणे, आण्णासाहेब कांदळकर, विकी बनकर, तारामती गोसावी, संपतराव मुठे, गणेश गोसावी, हेमंत दहिवाळ, रमेश सोनवणे, भारत सोनवणे, संजय बनसोडे, रज्जाक सैय्यद, ज्ञानदेव मुठे, बबन आसने, जालिंदर आसने, चांगदेव गोराणे, बाळासाहेब शिंदे, राजेंद्र देवकर, जाफर शेख, प्रमोद करंडे, संजय मोरगे, इम्रान शेख, अन्वर शेख, पंकज देवकर आदींसह भारत राष्ट्र समितीचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.