श्रीरामपूर : नायगाव ( ता. श्रीरामपूर ) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी माध्यमिक विद्यालय मध्ये कु. सायली सुशीलकुमार गोरे हिने इयत्ता आठवी मध्ये माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीरामपूर तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे.
कु. सायली हिने मिळविलेल्या यशाबद्दल जनसेवा मंडळ नायगाव स्व बाळासाहेब लांडे पाटील मित्र मंडळ यांच्या वतीने अभिनंदन केले तसेच तिला मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक श्री लबडे व इतर शिक्षक वृंद यांचेही नायगाव ग्रामस्थांनी व शालेय व्यवस्थापन समिती यास कडून कौतुकांचा वर्षव होत आहे.
ॲड. श्री प्रशांत राशिनकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, ग्रामीण भागाचा डंका हा उच्चस्तरीय नेण्याचे काम या विद्यार्थिनी केले आहे. ग्रामीण भागात अनेक समस्या आणि अडचणीला सामोरे जाऊन या विद्यार्थिनी यश संपादन केले आहे. नक्कीच नायगाव गावाचे नाव तालुकास्तरीय उंचावल्याने अभिनवस्पद बाब आहे.