याबाबत माहिती अशी की, वडाळा महादेव येथील दत्तू हा निराधार व स्मरणशक्ती कमी असलेला भोळसर व्यक्ती वडाळा महादेव गावचा रहिवासी आहे. येथील ग्रामस्थांच आणि दत्तूच माणुसकीचं अतुट नातं निर्माण झालेलं होत. त्याला स्वतःचे नावाशिवाय काहीही आठवणीत राहत नाही. अशा परिस्थितीमध्ये कोविड काळात दत्तू गावातून बेपत्ता झाला होता, त्याचा शोध घेऊनही तो मिळून आला नाही.परंतु चक्क तीन वर्षानंतर पुणे महानगर पालिका कामगार युनियनचे सिद्धार्थ प्रभुणे यांना मुंबई इलेक्ट्रॉनिक्स मिडियाच्या रिपोर्टर शैलेजा तिवले यांनी सदर माहिती कळविल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते कॉ. श्रीकृष्ण बडाख यांच्याशी संपर्क साधला असता कॉ. बडाख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दत्तू चे मूळ गाव शोधले.
या नंतर सचिन पवार यांनी दत्तू ला व्हिडिओ कॉल करुन "आम्ही लवकरच तुला घ्यायला येऊ काळजी करू नको" असे सांगितल्यावर दत्तू आनंदित झाला. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दत्तुला कलकत्त्याहून मंगळवारी वडाळा महादेव येथे आणण्यात आले. दत्तूला आपले गावं पाहून अश्रू अनावर झाले होते. समाजात माणूसकीच्या संवेदना बोथट होत असताना सदरचा भावनिक क्षण पाहून निराधार व्यक्तीलाही 'आपल गावं आपली माणस' भेटल्याचा आनंद द्विगुणित झाला.
यावेळी ईश्वर संकल्पचे पश्चिम बंगाल कलकत्ता येथून दत्तुला घेऊन आलेले तपन प्रधान म्हणाले की, आपण कितीही धन कमविले तरी आयुष्यात जिंकलेली मने, मिळविलेलं प्रेम, केलेली मदत मरणानंतर सुद्धा जिवंत राहते. यालाच माणुसकीचा धर्म म्हणतात. गरजूंना मदतीचा हात द्यावा हीच खरी माणुसकी आहे. वडाळा महादेव येथील ग्रामस्थांनी आज माणुसकी हाच खरा धर्म असल्याचे दाखवून दिले. माणुसकीचं नातं जोपासणारे गावं म्हणून त्यांनी गौरवोद्गार व्यक्त केले.
यावेळी वडाळा महादेव ग्रामपंचायतचे सरपंच अविनाश पवार, मा. सरपंच कृष्णा पवार, सचिन पवार, भगतसिंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कॉ. श्रीकृष्ण बडाख, निपाणी वडगावचे सरपंच संजय राऊत, उपसरपंच विलास जाधव, ईश्वर संकल्पचे समीर बनोबस, राजेंद्र कासार,ग्रामविकास अधिकारी नंदकिशोर शेळके, कृषी सहाय्यक क्षिरसागर, पिंटू खेमनर, सुहास राठोड, अशोक कुसळकर, आत्माराम गायकवाड, मच्छिंद्र कुसळकर, नाना राठोड, पंढरीनाथ शिंगटे, सुधाकर उबाळे, कांता राठोड, दिगंबर राऊत, दिपक पगारे, शिवाजी चौधरी, संजय कदम, राजेश गायकवाड, मच्छिंद्र भोंडगे, भरत साळवे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ईश्वर संकल्प या संस्थेने तीन वर्ष दत्तूचा सांभाळ करून औषधोपचार केले. त्याबद्दल वडाळा महादेव व निपाणी वडगाव ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा सन्मान करण्यात येऊन आभार व्यक्त करण्यात आले