'मोठ्या दैनिकात छोटी जाहिरात' देऊन 'चोरी चोरी चुपके चुपके' झाला वाहनांचा लिलाव ; श्रीरामपूर तालुका पोलीस प्रशासनाचा 'सकाळ'चा लिलाव संशयाच्या भोवऱ्यात

वर्तमानपत्रात जाहिरात देताना त्यात शासनाच्या नियमानुसार लिलावातील वाहने, लिलाव घेण्यात येणारा दिवस, दिनांक व वेळ ठळकपणे दर्शविण्यात यावा, असे जमादार यांनी म्हटले आहे.


श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत जप्त केलेल्या दुचाकी वाहनांच्या लिलाव भल्या 'सकाळी' 'चोरी चोरी चुपके चुपके' झाल्याने अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. या लिलावात मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाला असल्याचा आरोप करून या वाहनांचा पुन्हा लिलाव करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी केली आहे.

एका दैनिकात छोटी जाहिरात देऊन हा लिलाव घेण्यात आला असला तरी या लिलावाच्या जाहिरातीमध्ये लिलाव किती वाजता घेणार ? हे टाकण्याचे जाणीवपूर्वक टाळून कार्यालयीन कामकाज सुरु होण्याआधी सकाळीच गुपचूप  लिलाव घेण्यात आला. या लिलावात संबंधित अधिकारी आणि लिलाव घेणारे यांच्यात संगनमत होऊन शासनाची फसवणूक केली जात असल्याचा संशय बळावत असल्याचे जमादार यांनी म्हंटले आहे. चोरी छुपे झालेला हा वाहनांचा लिलाव रद्द करून पुन्हा नव्याने लिलाव घेण्यात यावा, अन्यथा, समाजवादी पक्षाच्या वतीने या गैरकारभाराविरुद्ध आवाज उठविण्याकरीता रस्त्यावर उतरुन आंदोलने छेडण्याचा इशारा जमादार यांनी दिला आहे.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post