सद्गुरू म्हणजे चिरंजीव ऊर्जा - प्रा आदिनाथ महाराज


श्रीरामपूर (वडाळा महादेव)  : सद्गुरू म्हणजे मनुष्याच्या जीवनातील चैतन्य,प्रेरणेचा खळाळत झरा असतो पावसाच्या आगमनाने जसे सृष्टीत चैतन्य येते तसे सद्गुरू म्हणजे आपल्या जीवनात चिरंजीव ऊर्जा असतात असे प्रतिपादन ह.भ.प.प्रा आदिनाथ महाराज जोशी यांनी केले आहे.

वडाळा महादेव येथील श्री क्षेत्र रेणुका देवी आश्रमात गुरुपौर्णिमा निमित्तानेआयोजित नारदीय कीर्तन प्रसंगी ते बोलत होते

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा 'श्री गुरु सारीखा असता पाठीराखा' हा अभंग त्यांनी निरूपणास घेतला होता. जीवनात गुरुचे पाठबळ मिळाले तर कशाची काळजी नसते.अध्यात्म ,साहित्य,संगीत,कला क्रीडा सर्वच क्षेत्रात गुरुचे महत्व  अनन्यसाधारण असल्याचे ते म्हणाले उत्तर रंगात संत नामदेव महाराज यांचे आख्यान सादर केले.संवादीनीवर साहेबराव हांडे, तबल्यावर गणेश वाघ ताल वाद्य विनायक जगदाळे , विजय शिंदे गायन साथ ह भ प दत्तोपंत भालेराव महाराज यांनी केली.यावेळी श्रीरामपूर येथील आर डी म्युझिक अकादमीचे चंदन दुग्गल व रोहीत दुग्गल सर यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या साथीने देवीची गाणी व सद्गुरू साईबाबांची गीते सादर केली उपस्थित महीलांनी संगीताच्या तालावर फेर धरून फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.

प्रारंभी सकाळी सौ व श्री उमेश कुलकर्णी यांच्या हस्ते राजराजेश्वरी रेणुका देवी महापूजा करण्यात आली.बाबूराम शिंपी यांनी पादुका पूजन केले पौरोहित्य ओंकार कुलकर्णी व शुभम नांदुरकर यांनी केले.बाळू मोरकर यांनी ध्वजारोहण केले.

सौ तेजस्विनी जोशी व सौ स्नेहल शिंदे यांनी पंचपदी सादर केली.किर्तनानंतर सौ व श्री अंकुश कुलकर्णी यांच्या हस्ते महाआरती झाली.महाप्रसादाचे यजमान श्री रामचंद्र कुलकर्णी जगदीश भालेराव दामोदर जानराव यांनी सर्वांचा सत्कार केला.

श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, पतसंस्था फेडरेशनचे वासुदेव काळे नरहरी पतसंस्थेचे सोमनाथ महाले डॉ काटे स्वामी पतसंस्थेचे अनिरुद्ध महाले दादासाहेब राऊत पत्रकार रवी भागवत सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी, अरुण धर्माधिकारी यांनी भेट दिली. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती होती महाप्रसाद वाटपाने महोत्सव सांगता झाली.यशस्वीतेसाठी सद्गुरू सेवा मंडळाचे सर्व साधकांनी परिश्रम घेतले

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post