धनगर समाजाला अनुसुचित जमाती मध्ये समावेश करावा म्हणून खेमनर यांनी नागपुर, पुणे, मुबई, नगर अशा अनेक ठिकाणी धनगर समाजाच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होते. मेंढपाळांना वनक्षेञ मिळावे, यासाठी पाठपुरावा खेमनर यांनी केला. सोलापुर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर नाव द्यावा, म्हणून लढ्यामध्ये सहभाग घेतला. अहमदनगरचे अहिल्यादेवी होळकर नामांतर लढ्यामध्ये सहभागी होऊन महत्त्वाची भुमिका बजावली. १३ वर्ष ते खा. डॉ.विकास महात्मे व बापुसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून नगर मध्ये काम करत आहे.
या सर्व कामाची दखल घेऊन श्री दताञय खेमनर यांची आखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बापूसाहेब शिंदे यांनी त्यांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्त केले.
खेमनर यांच्या निवडीबदल श्री श्री १००८ परमहंस कालीदास बाबा बालयोगी महेश्वरानंद महाराज, महंत स्वामी अरूणाथगिरी महाराज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेन्द फडणवीस, महसुल मंञी राधाकृष्ण विखे पाटील, मा खा डॉ विकास महात्मे, राष्ट्रीय श्री राम संघाचे अध्यक्ष सागरभैया बेग , स्वारद फाऊंडेशन धर्मरक्षक शरदभाऊ मोहळ, उद्योजक मचिन्द ( आण्णा ) कांडेकर, उद्योजक श्री प्रसाद म्हसे पाटील, उद्योजक सुदाम लोंढे, मा जि प सदस्य शरद नवले, मा सभापती दिपक पटारे, मा,उपसभापती बाळासाहेब तोरणे, अॕड पालवे, मेजर अमोल बोचरे आदींनी अभिनंदन केले वे पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.