गावातील सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुक्कड यांनी गावात अनेक सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविले. त्यात स्मशानभुमी, दशक्रिया विधी घाट सुशोभिकरण यांचा समावेश आह. गावातील पुरातन महादेव मंदिराचाही जिर्णोद्धार त्यांनी केला. आता केशव गोविंद भगवान मंदिराचीही देखभाल सुरु केलेली आहे. त्यांच्या या योगदानात आपलाही खारीचा वाटा हवा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवुन संचालक मंडळाच्या बैठकीत श्री केशव गोविंद भगवान मंदिराच्या रंगकामाकरीता ५१ हजार रुपये देण्याची सुचना बाजार समीतीचे सभापती व बेलापुर सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले यांनी मांडली. त्यास सर्व संचालकांनी मान्यता दिली. त्यानुसार सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुक्कड यांच्याकडे रुपये ५१ हजारचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.
यावेळी बाजारा समीतीचे सभापती व बेलापुर सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले व्हा चेअरमन पंडीतराव बोंबले संचालाक शेषराव पवार , शिवाजी पाटील वाबळे राजेंद्र सातभाई , नंदकिशोर नवले, कनजी टाक , ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक ,पत्रकार देविदास देसाई, कलेश सातभाई ,बंटी शेलार , गोरक्षनाथ कुऱ्हे, संजय रासकर ,संजय शेलार सचिव विजय खंडागळे मँनेजर दायमा आदि उपस्थित होते.