![]() |
File photo |
पोलीस प्रशासनाचा वचक नसल्यामुळे अवैध धंद्यानी श्रीरामपूर शहर पुरते पोखरले गेले आहे. शहरात ठिकठिकाणी गुटखा, माव्याची विक्री केली जात आहे. विषारी घटक निश्चित मावा शरीरासाठी अत्यंत घातक असून त्यांनी कॅन्सरसारखा दुर्धर आजार होण्याची दाट शक्यता आहे. शहरातील तरुण पिढी या विषारी माव्याच्या आहारी जात आहे. या माव्यामध्ये काही विषारी घटक आहेत. शहरातील विविध संघटनाने वारंवार मावा, गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे अनेक निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक यांना देऊन देखील मावा विक्री सुरूच आहे. आत्तापर्यंत फक्त तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करून बोळवन करण्यात आली.
शहरातील नागरिक व तरुण वर्गाला या विषारी माव्यापासून दूर करण्याकरिता मावा विक्रीचे समूळ उच्चाटन होणे गरजेचे आहे.या माव्या विक्रेत्यांवर अमली पदार्थ संदर्भात असलेल्या कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई करावी अन्यथा १४ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर शिवस्वराज्य सामाजिक संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येईल, असा इशारा शिव स्वराज्य मंचचे संस्थापक अध्यक्ष सलमान पठाण, आलोक थोरात, दीपक आव्हाड, युसुफ शेख, उत्तम पवार आदींनी दिला आहे.