यासंदर्भात श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवस्वराज मंचचे संस्थापक अध्यक्ष सलमान पठाण, लहुजी सेनेचे रईस शेख, रमीज पोपटिया, आर के खामकर, अन्वर पठाण, दीपक आव्हाड, चंदू परदेसी, सिद्धार्थ मोहन, सिकंदर तांबोळी, युसुफ शेख आदि उपस्थित होते.
निवेदनात म्हंटले आहे कि, अशा प्रकारच्या घटना वारंवार होत आहेत. असे घटना परत घडु नये याकरिता प्रशासनाने, गृह मंत्रालयाने दखल घेऊन या घटनेमागे असलेल्या आरोपीना कडक कठोर करून फाशीची शिक्षा करावी. माणुसकीला काळिमा फासणारा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्यानंतर तणाव वाढला आहे. एका जमावानं दोन महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावरून त फिरवलं. त्यांचा भर रस्त्यात विनयभंगही करण्यात आला. काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, या दोन महिलांना शेतात नेऊन तिथे त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.या घटनेचा शिव स्वराज्य सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहिर निषेध केला.