मुळा पाटबंधारे विभागात भ्रष्टाचार बाहेर येऊ नये यासाठी माहिती न देता लाखों रुपयांचे वाटप


अहमदनगर : मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर येथे कार्यरत असणारे शाखाधिकारी स्वप्नील देशमुख व श्री खरसे यांनी भ्रष्टाचार बाहेर येऊ नये यासाठी माहिती न देता लाखों रुपयांची वाटप केल्याने त्यांचेवर कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करावे, अशी तक्रार राजेश बोरुडे यांनी केली आहे.

      यासंदर्भात मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे प्राथमिक तक्रार करण्यात आली आहे. लोकसेवक स्वप्नील देशमुख व श्री खरसे यांच्यावर त्वरित कारवाई झाली नाही तर कार्यकारी अभियंता, सर्व उपविभागीय अधिकारी व शाखाधिकारी यांच्या सविस्तर तक्रारी वरिष्ठ अधिकारी, मंत्री, सचिव, अंमलबजावणी संचालनालय, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग आदी सर्व शासकीय स्तरावर पाठपुरावा करून दोषींवर कायदेशीर कारवाईसाठी उपोषण, आंदोलन छेडण्यात येईल, वरिष्ठ पातळीवर तक्रारी करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.

           मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिनस्त असलेल्या नेवासा, अमरापूर व घोडेगाव उपविभागीय स्तरावरावरील शाखाधिकारी स्वप्नील देशमुख व श्री खरसे यांनी भ्रष्टाचार करून लाखों रुपयांची वाटप केली आहे. लोकसेवक स्वप्नील शिंदे व श्री खरसे यांनी माहिती अधिकारात अर्ज केलेल्या अर्जदारांना माहिती न देता मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप करतात दडपशाहीचा वापर करून त्यांच्याकडून माहिती मिळाल्याचे खुलासे लिहून घेतात. या कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने माहिती अधिकारात मागितलेली माहिती न देता वर उल्लेख केलेले दोन लोकसेवक अर्जदारांना पैसे देतात. अपील केल्यानंतरही माहिती दिली जात नाही. येथील सर्व कामांची चौकशी तपासणी झाल्यास करोडो रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर येणार असल्याचे राजेश बोरुडे यांनी म्हटले आहे.




Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post