मुबई ( प्रतिनिधी ) : संपुर्ण भारत देशातील धनगर समाजाच्या सर्व संघटना एकञित येऊन स्थापन करण्यात आलेली आखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेच्या महाराष्ट्र महिला प्रदेशअध्यक्षपदी भाजपा नेत्या ओबीसीसाठी नेहमी लढा देणाऱ्या डॉ.अर्चना पाटील प्रदेश उपाध्यक्ष यशवंत, बिगेड प्रदेश अध्यक्ष श्री बापुसाहेब सोलवनकर प्रदेश कार्य अध्यक्षपदी संभाजी नगर धनगर समाज संघर्ष समिती चे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब जानराव यांची राष्ट्रीय अध्यक्ष श्री बापुसाहेब शिंदे आदेशावरुन प्रदेश अध्यक्ष श्री दताभाऊ खेमनर यांनी निवड केलीआहे.
भारतीय धनगर समाज विकास परिषद राष्ट्रीय कार्यकारणी पुर्ण झाल्या नंतर महाराष्ट्र कार्यकारणी तयार होत आसुन त्यात धनगर समाजातील सर्व संघटना च्या प्रमुख पदाधिकारी यांना,सामावुन घेण्यात येणार आहे अशी माहिती प्रदेश अध्यक्ष श्री दताभाऊ खेमनर यांनी सांगितले आहे.