गुणवंत रत्नकन्येने केला माता-पिता, शिक्षकांचा ईच्छापूर्ती कृतज्ञता सन्मान सोहळा


बेलापूर :  मुला मुलींना जन्म देणे सोपे असते पण, चांगले शिक्षण व चांगले संस्कार देण्याचे अवघड काम शिक्षकच करतात. म्हणून शिक्षकांना दुसरे पालक म्हटले पाहीजे. शिक्षकांनी सुद्धा स्व. पांडूरंग सदाशिव साने गुरुजी यांची प्रेरणा व विचार आत्मसात करुन त्यांच्या विचारावर काम करुन माजी राष्ट्रपती डाॅ.अब्दुल कलाम यांचे स्वप्न साकार करावे, असे प्रतिपादन श्री केशव गोविंद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य बापूसाहेब पुजारी यांनी केले.

बेलापूर खुर्द येथील वाघुजी रामजी पाटील विद्यालयाची व संध्या पुण्यात वास्तव्यात असलली  विद्यार्थीनी सौ.प्रतिक्षा खराडे - फळे हीने यु.जी.सी.नेट व जे.आर्.एफ सह पी.एच.डी पात्र यश संपादन केल्याबद्दल आई सौ.छाया किरण खराडे व वरिष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत डावरे यांना भम्रणध्वनी करुन प्रतिक्षा खराडे ईच्छा प्रगट केली.  मी माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतले त्या वाघुजी रामजी कन्या विद्यालयातील अध्यापक व माझ्या माता पित्याचा सन्मान करावा. तिच्या ईच्छेनूसार विष्णुपंत डावरे यांनी ईच्छापूर्ती कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुजारी अध्यक्षपदावरुन बोलत होते.

यावेळी अतिथी म्हणून सेवाव्रती सुवालालजी लुकंड, श्रीरामपूर तालुका वकील संघाचे अध्यक्ष विजयराव साळूंके,स्वाभिभानी भारत अभियानचे नगर उत्तर संघटक अरविंद शहाणे,महसुल अधिकारी विकासजी शिंदे सेवानिवृत्त अध्यापक हरिहर डावरे,किरण खराडे,आदि.उपस्थित होते.

यावेळी बोलतांना प्रभारी मुख्याध्यापिका सौ.मंजुषा गाडेकर म्हणाल्या प्रतिक्षा ही आमच्या विद्यालयाची मानसकन्या तीचा सोज्वळ स्वभाव, नम्रता, शिस्त या गुणामुळे आदर्श विद्यार्थीनी हा बहूमान मिळविला होता. अभ्यासाबरोबर पापड लाटणे, मेणबत्या,कापूर वड्या बनविणे,मेसचे डब्बे असे आई बरोबर गृहउद्योक करुन तीने पुढील शिक्षण तीने पुढील शिक्षण पुर्ण केले.आजही तीची आई बेलापूर येथील जि.प.प्रा.शाळेत अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे.

कार्यक्रमास सत्यमेव जयते मंचचे राधेशाम आबिंलवादे,दिलीप अमोलिक,वृत्तपत्र वितरक महेश ओहोळ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यापक रविंद्र बारहाते,उदय श्रीरसागर,शंशीकांत लोखंडे,सौ.अनिता व्यवहारे,मॅडम,सौ.उर्मिला थोरात,सौ. क्रांती भगत,सौ. उषा कोबरणे यांनी विषेश परिश्रम घेतले.

ईच्छापूर्ती कृतज्ञता सोहळ्यात गुणीजनांचा सन्मान करतांना सेवानिवृत्त प्राचार्य बापूसाहेब पुजारी, सेवानिवृत्त अध्यापक हरिहरजी डावरे,अॅ. विजयराव साळूंके अरविंद शहाणे, विष्णुपंत डावरे,किरण खराडे आदी


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post