मंगळवारी (दी.१३ ) संगमनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज छत्रपती संभाजी राजे यांच्या आदेशानुसार स्वराज्य प्रवक्ते व संपर्कप्रमुख करण गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी स्वराज्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशव गोसावी, उत्तर महाराष्ट्र सचिव शिवाजी मोरे, विजय वाहुळे, नवनाथ शिंदे, किरण डोके, पुष्पाताई जगताप, मनोरामाताई पाटील, आशिष कानवडे, कैलास धाकतोडे, दत्ता कुमावत, संभाजी थोरात, संदीप राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा संघटक राजेश शिंदे यांनी स्वराज्य संघटनेत कार्यकर्ता म्हणून उत्तम कार्य केले. प्रशिक्षण शिबिरातही सहभाग घेतला, संघटन बांधणी केली. त्यामुळे स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांच्या आदेशावरून राजेश शिंदे यांची उत्तर नगर जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली. राजेश शिंदे यांच्या निवडीबद्दल स्वराज संघटनेचे पदाधिकारी , कार्यकर्ते आदी मान्यवरांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.