प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्याचे विभाजनाची आवश्यकता अनेक वर्षांपासूनच आहे. सुरूवातीपासूनच जिल्ह्याचे केंद्रस्थान श्रीरामपूर असल्याची चर्चा होती. शिवाय श्रीरामपूर शहरात आरटीओ कार्यालय, एसटी कार्यशाळा,प्रांत कार्यालय, ग्रामिण रूग्णालय, रेल्वे स्थानक अशी महत्वाची कार्यालयांची स्थापना झाली असल्याने गुणवत्तेच्या आधारावर श्रीरामपूर हेच जिल्ह्याचे ठिकाण होण्यास योग्य आहे.
मात्र दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होणाऱ असल्याचे जाहीर केल्यानंतर या विषयाला पुन्हा तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी एकत्र येत आज दि. 17 रोजी श्रीरामपूर बंदची हाक दिली. श्रीरामपूर भाजपाच्यावतीनेदेखील या बंदला पाठींबा जाहीर करण्यात आला असून आम्ही श्रीरामपूरकरांच्या भावनांसोबतच असल्याचे बिंगले यांनी सांगितले. याबाबत ना. विखे यांना निवेदन दिले जाणार आहे. त्यांच्याकडे रितसर मागणी करून श्रीरामपूर हाच जिल्हा व्हावा यासाठी विनंती करणार असल्याचे बिंगले म्हणाले.