यावेळी बोलताना नामदार विखेंनी, शासन स्तरावर सध्या जिल्हा विभाजनाचा कोणताही विषय नसून जिल्हा विभाजनाचा निर्णय घेताना सर्व बाबी तपासून निर्णय होतील असे स्पष्ट करत शिर्डी जिल्हा होणार या अफवेची हवा काढून घेतली. सध्या श्रीरामपूरात राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जनतेच्या भावनांशी खेळण्याचा कुटील डाव काही राजकारणी करत असल्याचे परखड मत व्यक्त केले. श्रीरामपूरची बाजू मांडताना केतन खोरे यांनी जिल्ह्याच्या अनुषंगाने प्रशस्त असे प्रादेशिक परिवहन कार्यालय, शहरालगत उपलब्ध शेती महामंडळाची जागा, अतिरिक्त नगर रचना कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय, रेल्वे स्थानक, एमआयडीसी, जिल्हा सत्र न्यायालयामुळे पायाभरणी श्रीरामपूर येथे झालेली असल्याची माहीती दिली. तर दिपक पटारे व मारूती बिंगले यांनी गेल्या ४३ वर्षात नव्हे इतकी महत्वपुर्ण महसुल खात्याचा कारभार आपल्याकडे आला असल्याने श्रीरामपूर जिल्हा होण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून आपण श्रीरामपूर जिल्ह्याचे सर्वांचे स्वप्न साकार करावे अशी आग्रही मागणी केली.
यावेळी नानासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, सुनिल वाणी, माजी नगरसेवक दिपक चव्हाण, रवी पाटील, विठ्ठल राऊत, मंजूषा ढोकचौळे, सुनिल साठे, मनोज नवले, अभिषेक खंडागळे, बंडूकुमार शिंदे, पूजा चव्हाण, पुष्पलता हरदास, दत्ता जाधव, रूपेश हरकल, गौतम उपाध्ये, मिलींदकुमार साळवे, अजित बाबेल, बाबासाहेब साळवे, विजय आखाडे, विशाल यादव, अक्षय वर्पे, नितीन ललवाणी, महेंद्र पटारे, विशाल अंभोरे, बाळासाहेब हरदास, योगेश ओझा यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.