न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये योग दिन उत्साहात साजरा


श्रीरामपूर ( गौरव डेंगळे ) २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. त्याचेच औचित्य साधत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये पतंजली ध्यानपीठ साधक श्री नितीन चित्ते, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योग शिक्षिका सौ सुजाता शेडगे, सौ सुरेखा जगदाळे,सुनीता मांडण,रुपाली जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली ५५० विध्यार्थीनी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्सवात साजरा करण्यात आला.

योग ही आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे. हीच प्राचीन परंपरा नविन पिढीला निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरेल. म्हणून जगभरात २१ जुन  आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो.करोगे योग तो राहोगे निरोग हे ब्रीद वाक्याने जगभरात योग दिन साजरा करण्यात आला आहे.यावेळी शाळेचे प्राचार्य डॉ.योगेश पुंड तसेच शाळेतील शिक्षक वृंदानी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा आनंद घेतला.योग दिन यशस्वी करण्याकरीता क्रीडा प्रशिक्षक श्री गौरव डेंगळे व श्री नितीन गायधने यांनी अथक परिश्रम घेतले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post