यासंदर्भात 'साईकिरण टाइम्स'चे संस्थापक राजेश बोरुडे यांनी संगमनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, श्रीरामपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उप अभियंता यांना निवेदन देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. श्रीरामपूर-बेलापूर रस्त्याचे चौपदरीकरण झाले आहे. माञ, बेलापूर ते कोल्हार या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. जागोजागी खड्डे पडलेले आहेत. यापूर्वी रस्त्यांचे कामे केलेल्या कंत्राटदाराने रस्त्यांचे अत्यंत निकृष्ट काम केल्यामुळे रस्ता ठिकाठिकाणी उखडला आहे. यामुळे नागरीकांचे हाल होत असून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरु करण्याची मागणी राजेश बोरुडे यांनी केली आहे. बेलापूर ते कोल्हार रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर अनेक शाळा आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अनेक अपघातही होत असतात. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राजेश बोरुडे यांनी केला आहे.
बेलापूर येथील नगर बाह्यवळण रस्ता ते कोल्हार रस्त्याची उर्वरीत भागाची डागडुजी व दुरुस्ती काम बांधकाम विभागाने त्वरित करावे, अशी मागणी राजेश बोरुडे यांनी केली आहे.