श्रीरामपूर तालुक्यात सोमवारपासुन 'आनंदाचा शिधा'चे वितरण ; तहसीलदार पाटील


देविदास देसाई यांजकडून 

श्रीरामपूर : श्रीरामपुर तालुक्यासाठी गुढी पाडवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देण्यात येणारा 'आनंदाचा शिधा' श्रीरामपूर गोदामात आला आहे. सोमवार दि. ३ एप्रिल पासून तालुक्यात वितरण सुरु करण्यात येणार असल्याची माहीती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात तहसीलदार पाटील यांनी म्हटले आहे की, तालुक्यात सहकारी संस्था, महीला बचत गट, खाजगी व्यक्ती असे एकुण ११० स्वस्त धान्य दुकाने असुन तालुक्यात असणाऱ्या कार्डधारकासाठी तालुक्यासाठी एकुण ३६ हजार ८४० आनंदाचा शिधा उपलब्ध झाला आहे. सोमवार दिनांक ३ एप्रिल २०२३ पासून शासकीय गोदामातुन हा शिधा दुकाननिहाय वितरीत करण्यात येणार आहे.

 असा असेल शिधा...

  • १ किलो साखर
  • १ किलो चना डाळ
  • १ लिटर पामतेल
  • १ किलो रवा

तालुक्यातील कार्डधाराकांनी १०० रुपयात हा शिधा आपल्या जवळील रेशन दुकानातुन घेवुन जावा. याबाबत कुणाची काही तक्रार असल्यास पुरवठा विभागाशी सांपर्क साधावा, असे अवाहन तहसीलदार पाटील यांनी केले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post