नामदार विखे पाटलांनी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रुपेश हरकल यांच्याशी चर्चा करून श्रीरामपुरतील लव-जिहाद प्रकरणांची माहिती घेतली. लवकरात-लवकर महाराष्ट्रातही कठोर कायदा आणू, असे शहराध्यक्ष रुपेश हरकल आणि सरचिटणीस योगेश ओझा यांना सांगितले.
महाराष्ट्रात व देशामध्ये लव्ह जिहाद सारखे प्रकार सामाजिक सलोखा बिघडवणारे व सामाजिक तेढ निर्माण करणारे आहे. श्रद्धा वालकर या हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून आफताब पुनावाला या तरुणाने तिची दिल्ली येथे थंड डोक्याने निर्घृण हत्या केली. आता हा केवळ एक अपवादात्मक प्रकार राहिला नसून देशभरात असे हजारो प्रकार नियमितपणे उघडकीस येत आहेत.
धर्मांतर करणाऱ्यावर आळा बसेल व मुली सुरक्षित राहतील आणि हिंदू मुली समाजात निर्भिडपणे वावरू शकेल व पुढील काळात होणाऱ्या अशा घटना थांबतील, त्यामुळे आपण धर्मांतर बंदीचा व लव्ह जिहादचा कायदा महाराष्ट्रातही अंमलात आणावा ही विनंती युवा मोर्चातर्फे करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष दीपक अण्णा पटारे, शहराध्यक्ष मारुती बिंगले, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दत्ता जाधव, कोषाध्यक्ष लखन उपाध्ये, सांस्कृतिक सेलचे बंडुकुमार शिंदे, प्रसिधीप्रमुख पंकज करमासे, शहर उपाध्यक्ष्य तेजस उंडे, तालुका उपाध्यक्ष गणेश आठरे, बाळासाहेब हरदास, सुबोध शेवतेकर, प्रतिक वैद्य, अक्षय धुमाळ, भावेश कतिरा,सुजित तनपुरे, श्रेयस सुवर्णपाठकी, मनिष कुलकर्णी, किरण शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.