![]() |
नाशिक येथील हाँटेल रँडीसन ब्लू येथे अभिनेता चिन्मय उदगीकर व आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते तसेच दै सकाळचे संपादक प्रकाश पाटील, राजेंद्र लखोटीया शशिकांत कापसे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत आयडाँल महाराष्ट्र नगरचे मानकरी या पुरस्काराने सौ सुरेखा कैलास मदनलाल चायल कैलास चायल सन्मानित करण्यात आले.
कैलास चायल यांचे सामाजिक धार्मिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे .उद्योग क्षेत्रातही त्यांनी चांगले यश संपादन केले आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार लहु कानडे, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, भास्कर खंडागळे, उपसरपंच अभिषेक खंडागळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक, बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले, कै खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड, जनसेवा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सुवालाल लुंक्कड, पत्रकार देविदास देसाई, दिलीप दायमा, प्रा ज्ञानेश गवले, नवनाथ कुताळ, सुहास शेलार, विष्णूपंत डावरे आदिंनी अभिनंदन केले आहे.