महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नाशिक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण व नागपुर विभागातील प्रमुख पदाधिका-यांच्या नियुक्तीची यादी प्रसिध्द झाली आहे. त्यांनी नुकतीच नांदेड येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी डॉ. मुरकुटे यांच्या नियुक्तीबद्दल अशोक चव्हाण यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच याप्रसंगी सौ. अमिताभाभी चव्हाण, नांदेडच्या वरिष्ठ जिल्हाउपाध्यक्षा मीनलताई खतगावकर व महिला शहराध्यक्षा अनुजा तेहरा उपस्थित होत्या.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सवलाखे, आमदार लहुजी कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वंदनाताई मुरकुटे काँग्रेसमध्ये कार्यरत आहे. काँग्रेस पक्षाचा प्रचार आणि प्रसार, महिलांचे मोठे संघटन आशा प्रत्येक ठिकाणी त्यांची भूमिका अग्रस्थानी असून त्यांच्या याच कार्याची दखल प्रदेश काँग्रेस कमिटीने घेऊन त्यांना नांदेड सारख्या मोठ्या शहरात पक्षाचे निरीक्षक म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. राजकारणा बरोबरच समाजकारण करत आपल्या कार्याचा आगळा वेगळा ठसा डॉ वंदनाताई मुरकुटे यांनी उमटवला आहे.
डॉ. वंदनाताई मुरकुटे यांचे पती ज्ञानेश्वर मुरकुटे हे अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस असून मुरकुटे कुटुंबाचा काँग्रेस पक्ष कार्यकारणीमध्ये पक्ष प्रसार, पक्ष वाढ व पक्षाच्या विविध संघटनांच्या माध्यमातुन मोलाची कामगिरी आहे. डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या राजकीय प्रवासात पंचायत समिती सदस्य, श्रीरामपूर पंचायत समिती सभापती, महिला काँग्रेस महासचिव व आता नांदेड शहर निरीक्षक अशी वाटचाल आहे.
निरीक्षक पदी निवड होताच डॉ मुरकुटे यांनी नांदेड शहर गाठत काँग्रेस कमिटीची बैठक माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार अमिता अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. सदर बैठकीला प्रचंड प्रतिसाद मिळाला यावेळी मंगलताई निमकर, माजी महापौर रेखाताई चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष अनिता इंगोले, डॉ मिनल पाटील खतगावकर, कविता कळसकर, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.