भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते बुधवार २६ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता श्रीरामपूरच्या खा. गोविंदराव आदिक सभागृहात हा शिलाई मशीन वाटप सोहळा व महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे प्रमुख व पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, शहराध्यक्ष मारूती बिंगले, शहर उपाध्यक्ष तसेच मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य व एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक मिलिंदकुमार साळवे यांनी ही माहिती दिली. राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. भाजपचे प्रदेश कार्यालय प्रभारी रवी अनासपुरे, महामंत्री विजय चौधरी, माजी आमदार चंद्रशेखर कदम, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड, भारत दूरसंचार निगमचे संचालक रवींद्र बोरावके, आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
श्रीरामपूर शहर व तालुक्यातील विविध दानशूर दात्यांच्या लोकसहभागातून या शिलाई मशिनचे वाटप करण्यात येत आहे. कोरोनाच्या महासंकटामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील अनेक महिलांना आपल्या घरातील कर्त्या पुरुषाचा आधार गमवावा लागला. यातील गरजू होतकरू कोरोना एकल महिलांना त्यांच्या पायावर उभे करून स्वावलंबी बनविण्यासाठी व त्यांच्या हाताला रोजगार देण्यासाठी या शिलाई मशिनचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी या उपक्रम समितीमधील गणेश राठी, मारुती बिंगले, मिलिंदकुमार साळवे, शशिकांत कडूसकर, रवी खटोड, भरत साळुंखे, अजित बाबेल, राजेंद्र कांबळे, कांतीलाल बोकडिया,विजय आखाडे, रवी पंडित, साजिद शेख, किरण रोकडे, बंडूकुमार शिंदे,विशाल यादव, भाजयुमोचे शहराध्यक्ष रूपेश हरकल, अक्षय वरपे, अक्षय नागरे, बाळासाहेब जपे, महिला मोर्चाच्या रेखा रिंगे, पूजा चव्हाण, राजेश राठी, पियुष दुधेडिया, चंद्रकांत परदेशी, गोविंद कांदे, नारायण काळे, सुनील चंदन, मुनीर शेख, संजय माखिजा, राजू धामोणे, हंसराज बत्रा आदी परिश्रम घेत आहेत.